सांगोला (कटूसत्य वृत्त):- शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत एकमुखाने नगराध्यक्षपदाचे ठरलेले उमेदवार मारती बनकर यांच्यासह नेत्यांवर दबाव आणून व पक्षांतर करायला लावून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बनकर यांना नगराध्यक्षपदासाठी भाजपचा एबी फॉर्म दिला व अर्ज दाखल केल्याने शेकापच्या बालेकिल्ल्यात सांगोला नगरपरिषदेत प्रथमच भाजपला उमेदवार मिळाला आहे. तालुक्यातील विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था अथवा सहकारी संस्थांच्या निवडणुका यामध्ये स्व. गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे नेते जी नावे निश्चित करीत असत त्यांना उमेदवारी दिली जात असे. मतदारही याचे स्वागत करीत होते.
परंतु नऊ वर्षांनंतर होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपायला दोन तास राहिले असताना शेकापचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपमध्ये गेला. हे पाहता सांगोला तालुक्याचे राजकारण स्थानिक नेत्यांच्या हातात न राहता माण तालुक्याच्या नेत्यावर अवलंबून राहिले आहे. शेकाप, भाजप व दीपक साळुंखे-पाटील अशी तिघांची आघाडी झाली. यानंतर त्यांचे ठरलेले उमेदवार तहसील कार्यालयात अर्ज भरण्यास गेले. पुरोगामी विचारसरणीच्या तालुक्यात पालकमंत्री गोरे यांनी वर्षाच्या आत कमळाला उमेदवार मिळवून दिले. परंतु त्यांच्या या कृतीबद्दल नागरिकांत संताप व्यक्त
होत आहे.
शेकापने निश्चित केलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुती बनकर हे स्वतःहून उमेदवारीसाठीइच्छुक नव्हते. गेले चार दिवस से बाहेरगावी होते. कारण त्यांचे जिवाभावाचे मित्र बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये गेले होते. त्यांनी गेली साठ वर्षे स्व गणपतराव देशमुख यांची पुरोगामी विचारसरणी जपली होती, तो विचार सोडण्याची वेळ बनकर यांच्यावर आली. विकास निधीसाठी शेकापने विचारसरणीला तिलांजली दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राणीताई माने यांनी
उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. पी. सी. झपके तसेच त्यांचेचिरंजीव विश्वेश झपके या दोघांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. परंतु निवडणूक विश्वेश शपके हेच लढवणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांच्या ११ उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत.
सांगोल्यात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात
पालकमंत्री गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र काम करत होते. मात्र, या निवडणुकीमध्ये चित्र पालटले आहे.
0 Comments