राजश्री चव्हाण यांचा एकच ध्यास प्रभाग 26 चा विकास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 13, 2025

राजश्री चव्हाण यांचा एकच ध्यास प्रभाग 26 चा विकास

 राजश्री चव्हाण यांचा एकच ध्यास प्रभाग 26 चा विकास




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक 26 मधील हेरिटेज फॉर्म, ज्योती नगर, बँक कॉलनी, बंडापा नगर, कोरे वस्ती, उद्धव नगर भाग एक व दोन, अमर नगर सोरेगाव, स्वस्तिक नगर, शितल नगर, रजनीश रेसिडेन्सी, आदित्य रेसिडेन्सी, आर्यश रेसिडेन्सी. या नगरात नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाठपुरावा केल्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्णत्वास झाली असून तेथे पाण्याची पाईपलाईन नसल्याबाबत संबंधित नगरातील नागरिकांनी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे साहेब यांना सदर नगरामध्ये पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असले बाबत सांगितल्यानंतर तातडीने वरील सदर नगरात पिण्याचे पाणी पाईपलाईन साठी निवेदन सादर करावे असे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीने आजचे आज निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे वरील नगरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

तातडीने वरील नगरातील पाण्याच्या पाईपलाईन समस्या बाबत पाठपुरावा केल्याबद्दल वरील नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेवक असावा तर नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सारखा असावा विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाच्या कार्यकाल संपलेला असताना सुद्धा जातीने मनावर घेऊन पाठपुरावा करून नागरिकाच्या समस्या सोडवीत आहेत अशा कर्तव्यदक्ष, अभ्यासू, जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो भविष्यात त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव पाठीशी राहू असे मनोगत व्यक्त केले व जलद गतीने पाठपुरावा केल्याबद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages