Hot Posts

6/recent/ticker-posts

विराज गोडसे याची महाराष्ट्र बास्केटबॉल संघामध्ये निवड

 विराज गोडसे याची महाराष्ट्र बास्केटबॉल संघामध्ये निवड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्थेतील विराज विकास गोडसे या विद्यार्थ्याची, महाराष्ट्र बास्केटबॉल संघामध्ये नुकतीच निवड झाली असून सर्वस्तरातून  त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज संचलित, शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर अकलूज, यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित,शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर-अकलूज व शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमी अकलूज मधील विद्यार्थी दिनांक 08/11/2025 ते दिनांक 10/11/2025 पर्यंत सातारा  येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. विराज विकास गोडसे याची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघामध्ये निवड झालेली आहे. 

या विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल त्याचे व त्यांच्या पालकांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष खासदार  धैर्यशिल मोहिते-पाटील, अध्यक्षा तथा शिवरत्न पॅटर्नचे चेअरमन सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य ,समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments