शिवसेना शिंदे पक्षाच्या माध्यमातून आपल्या मोहोळ शहराचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्यासाठी सज्ज व्हा
प्रथम नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे पक्षाचे राज्याचे ओबीसी विभागाचे नेते रमेश बारसकर यांचे आवाहन
मोहोळ येथे अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे पक्षात जाहीर प्रवेश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आपल्या मोहोळ शहराला रस्ते पाणी आरोग्य वीज याबाबत अद्यावत शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी फक्त आणि फक्त शिवसेना शिंदे पक्षच अविरतपणे कार्यरत आहे. या पक्षाची विचारधारा मनाला भावल्यामुळेच मोहोळ शहराच्या कानाकोपऱ्यातील शेकडो युवक या पक्षात प्रवेश करत आहेत ही निश्चितपणे आम्हा पक्षनेत्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. या पुढील काळातही माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री तथा राज्याच्या नगर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री ना. एकनाथ शिंदे त्याचबरोबर ज्येष्ठ मंत्री भरतशेठ गोगावले, ना. प्रताप सरनाईक या नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या सहकार्याने मोहोळ शहरात शिवसेना शिंदे पक्षाचा बालेकिल्ला बळकट करण्यासाठी आम्ही अविरतपणे प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे पक्षाचे राज्याचे ओबीसी विभागाचे नेते रमेश बारसकर यांनी काल मोहोळ येथे दिली.
काल मोहोळ शहराच्या पूर्व भागातील शिवसेना शिंदे पक्षाचे पॉवर स्टेशन म्हणून ओळखल्या गेलेल्या क्रांती भवन येथे मोहोळ शहराच्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. यावेळी गळ्यात धनुष्यबाण चिन्ह असलेले भगवे उपरणे घालत प्रथम नगराध्यक्ष बारसकर यांनी पक्षात सर्वांना उत्साहात प्रवेश दिला. यावेळी आपल्या हाती धनुष्यबाण चिन्ह घेऊन सर्व प्रस्थापित पक्षांना एकमुखी आव्हान दिले. या प्रवेश सोहळ्यामुळे मोहोळ शहराच्या राजकारणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर बोलत होते
सध्या मोहोळ शहरात रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यापूर्वीच्या प्रस्थापित पक्षातील राजकीय मोनोपल्लीला वैतागलेल्या अनेक युवकांनी या निवडणुकीत उतरण्यासाठी शिंदे सेनेच्या माध्यमातून जोरदार एन्ट्री करत प्रवेश करत शहरातील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
चौकट
याप्रसंगी शिवसेना शिंदे पक्षात
दौलतराव देशमुख (बंडु देसाई), संजय देशमुख रियाज शेख, मोहम्मद शेख, अहेमद शेख, अल्ताफ शेख, आमिर शेख, गफार शेख, रोफ शेख, शाहिद शेख, सलीम शेख, परवेज शेख, मोईन शेख, वाजिद शेख, अलीम शेख, कलीम शेख, जुबेर शेख, मोहम्मद शेख सर, मोहसीन हरणमारे, आयान शेख, फिरोज शेख, फारुख शेख, सज्जाद शेख, रियाज शेख, सोमनाथ मोरे, सुमित सोनवणे, आकाश अंबर, शाहीर देशमुख सत्यजित देशमुख रणाधीर देशमुख यांनी प्रवेश करत आणि निवडणुकीत जोरदार वातावरण निर्मितीला प्रारंभ केला आहे.
चौकट
मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण पार्श्वभूमीवर मोहोळ शहरातील शिवसेना शिंदे पक्षाने आता मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मितीला दमदारपणे प्रारंभ केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. शिवसेना शिंदे पक्षात होत असलेल्या इन्कमिंगमुळे अन्य प्रस्थापित पक्षांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे आधारवड ना. एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाचे सर्वेसर्वा आहेत. आणि नगरपरिषद निवडणूक हि विकास कामांशी निगडित असल्यामुळे या निवडणुकीवर संपूर्ण राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वैचारिक प्रभावाचा वरचष्मा जाणवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळचे ओबीसी सेलचे राज्याचे नेते तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मोहोळ शहरातील सर्व प्रभागातील अनेक युवकांना जास्तीत जास्त संख्येने शिवसेना शिंदे पक्षात सामील होण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

0 Comments