Hot Posts

6/recent/ticker-posts

विरोधकांच्या ताब्यात गेलेला प्रभाग आठ चा गड पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी सोमनाथ पवार यांनाच संधी द्या

 विरोधकांच्या ताब्यात गेलेला प्रभाग आठ चा गड पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी सोमनाथ पवार यांनाच संधी द्या




शहराच्या पश्चिम भागातील शिवसैनिकांचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांना साकडे

सर्वधर्मसमभाव जपणारा आणि भाईचारा ठेवणारा एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून सोमाबापू पवार यांची ख्याती


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या यापूर्वीच्या जुन्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये गत वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचे खाते उघडले तर लगतचा प्रभाग क्रमांक १३ हा शिवसेनेने भगवा फडकवत ताब्यात घेतला आता याच दोन जुन्या प्रभागांचा मिळून नवा प्रभाग क्रमांक आठ तयार झाला आहे आणि हा प्रभाग पुन्हा विरोधकांच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते दीपक मेंबर गायकवाड यांनी पडद्याआड रणनीतीला प्रारंभ केला आहे वास्तविक पाहता दोन भिन्न समाजांच्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असलेला हा मतदारसंघ एका बाजूला शिवसेना बहुल तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम बहुल मतदारसंघांचा समावेश असलेला अत्यंत मोक्याचा प्रभाग आहे या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्ह हातात घेऊन युवा नेते सोमनाथ बापू पवार हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये सोमनाथ बापू पवार यांनी आपला रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज पक्षश्रेष्ठींकडे दाखल केला आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठ सोमनाथ बापू पवार यांच्या उमेदवारी बाबत निश्चितच सकारात्मक पवित्रा घेतील असा विश्वास सोमनाथ पवार यांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा आहे
सोमनाथ म्हणजे सोमा बापू पवार हे मोहोळ शहराच्या पश्चिमेकडील भागातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आणि अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केलेले निरपेक्ष कार्यपद्धतीचे युवा नेते म्हणून परिचित आहेत. अंगात जरी कडवी आणि कठोर शिवसेना असली तरी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची मनमिळाऊ भूमिका त्यांना आजपर्यंत राजकारणामध्ये चर्चेत ठेवू शकली आहे. त्यामुळे शिवसेनेने संधी दिल्यास या ठिकाणाहून सोमनाथ पवार हे निश्चितपणे विरोधकांना कडवी झुंज देऊन निश्चितपणे या प्रभागावर शिवसेनेचा भगवा अगदी दिमाखात फडकवतील असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. त्यामुळे या प्रभागातील अनेक शिवसैनिकांचे शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांची भेट घेऊन सोमनाथ पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

चौकट
मोहोळ शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या प्रसंगी त्यांनी दिलेला प्रशासना विरोधातील लढा आजही कोणी विसरले नाहीत. विशेष म्हणजे या प्रभागातील मुस्लिम बांधवासोबत देखील प्रत्येक सणाला सहभागी होऊन सामाजिक आणि सर्वसमावेशक भाईचारा जपला आहे. सर्व हिंदू मुस्लिम समाजाच्या तसेच अन्य समाज बांधवांच्या सुखदुःखात अगदी अंतर्मनाने निर्मळ भावनेने सहभागी होऊन त्यांच्याबद्दल मनात आदरभाव ठेवणारे सर्वधर्म समभाव जपणारे व्यक्तिमत्व म्हणून सोमनाथ पवार यांच्याकडे पाहिले जाते.

Reactions

Post a Comment

0 Comments