“मतदारांची गोपनीयता भंग होत असल्याचं सांगणाऱ्या निवडणूक आयोगाने आता गप्प का?” - आ. रोहित पवारांचा सवाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आ. रोहित पवार यांनी थेट निशाणा साधला आहे. “CCTV फूटेज मागितल्यावर मतदारांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचं सांगणाऱ्या आयोगाने आता महिला भगिनींच्या गोपनीयतेचा भंग होत असताना गप्प का बसले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून निवडणूक आयोगाच्या दुहेरी भूमिकेवर टीका करत लिहिलं आहे की, “निवडणूक आयोगाला मतदानाचं CCTV फूटेज मागितलं असता मतदारांच्या गोपनीयतेचा भंग होत होता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता... मग आज अशा प्रकारे महिला भगिनींच्या गोपनीयतेचा भंग होत नाही का? आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का? तसं असेल तर निवडणूक आयोग कारवाईस पात्र ठरत नाही का?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पवार यांनी पुढे ‘ऐसा कैसा चलेगा ग्यानेश बाबू?’ अशी उपरोधिक टीका करत आयोगाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त केला आहे.या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाने या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments