Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग दहा मधून चैतन्यबापु देशमुख यांनी धनुष्यबाण ताणल्याने प्रस्थापित पक्षांनाही फुटतोय घाम

 प्रभाग दहा मधून चैतन्यबापु देशमुख यांनी धनुष्यबाण ताणल्याने प्रस्थापित पक्षांनाही फुटतोय घाम




आमदार राजू खरे, ओबीसी नेते रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भक्कम साथ देशमुख परिवारालाच

ज्येष्ठ आणि अनुभवी नेते पद्माकर अप्पा देशमुख यांच्या रणनीतीचा होणार मोठा फायदा

मोहोळ (साहिल शेख):- सध्या मोहोळ शहरात अन्य दिग्गज पक्षांपेक्षा सर्वात मोठी चर्चा आहे ती शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाची. असा एकही दिवस जात नाही की या धनुष्यबाण चिन्हाच्या पक्षात कोणाचा प्रवेश होत नाही. सर्वाधिक भक्कम स्थिती असलेला नगरपरिषद निवडणुकीतील बलाढ्य पक्ष म्हणून आता शिवसेना शिंदे गट पुढे येताना दिसत आहे.
प्रभाग १० हा मोहोळ शहराच्या दक्षिण पूर्व भागातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग आहे. या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षांना कोण अव्हान देणार याबाबत बरेच तर्क वितर्क लढवले जात होते.मात्र या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर युवा उद्योजक आणि चैतन्य प्रसाद उद्योग समूहाचे चैतन्य पद्माकरअप्पा देशमुख हे निवडणूक लढवण्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. 

यापूर्वी चैतन्य देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत अधिकृत प्रवेश करून आपली राजकीय रणनीती जाहीर केली.ते नगरपरिषद निवडणूक लढवणार का ?  या बाबत बरेच दिवस उत्सुकता होती. मोहोळ मतदारसंघाचे दक्ष आमदार राजू खरे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, ओबीसी सेलचे राज्याचे नेते रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, ज्येष्ठ नेते पद्माकर आप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले चैतन्य देशमुख यांची नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय एन्ट्री सर्वत्र चर्चेचा भाग बनत आहे. गत आठवड्यात मोहोळ शहराचे जेष्ठ मार्गदर्शक असलेले पद्माकर अप्पा देशमुख यांचे सुपुत्र चैतन्य देशमुख यांनी प्रभाग दहा मधून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताच या प्रभागातील अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. 


चौकट
पद्माकर आप्पा देशमुख हे मोहोळ शहरातील किंगमेकर नेते म्हणून ओळखले जातात. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात सातत्याने सहभागी होणारा हा परिवार शहरातील नावलौकिक प्राप्त केलेला प्रथितयश परिवार आहे. यापूर्वी पंधरा वर्षाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत तत्कालीन राष्ट्रवादीला चाणाक्ष डावपेचाने नामोहरम करत पद्माकर अप्पा देशमुख यांनी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन मोहोळ ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकवल्याचे अजून शहर विसरले नाही. त्यामुळे धक्कातंत्राच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले जायंट किलर स्वभावाचे पद्माकर आप्पा हे चैतन्य देशमुख यांच्या विजयासाठी देखील मोठी आणि निर्णायक भूमिका बजावणार असा चैतन्य देशमुख यांच्या समर्थकांना विश्वास आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments