प्रभाग सहा मधून शबाना शेख निवडणूक लढवणार
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत
अल्ताफ शेख यांच्या परिवाराचीच सर्वाधिक चर्चा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यापूर्वी राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या चेहऱ्यांबरोबर इतर नव्या चेहऱ्यांना देखील राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची महत्त्वपूर्ण संधी या निवडणुकीतील आरक्षणामुळे उपलब्ध झाली आहे. मोहोळ शहराच्या पूर्वभागातील राजकारणाचा दबदबा संपूर्ण शहराच्या राजकारणावर असल्याचे आज तागायत बऱ्याचदा झाले आहे. मोहोळ शहराच्या पूर्व भागात दोन प्रभागांचा मिळून नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग सहा मध्ये यावेळी राजकीय समीकरणांना गतीने प्रारंभ झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग दोन आणि तीन असा स्वतंत्र असताना या प्रभागाने शहराच्या नगर परिषदेचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे दोन्ही प्रभाग महत्त्वाचे ठरले. प्रभाग दोन मधून दिवंगत नेते तथा उपनगराध्यक्ष शौकतभाई तलफदार हे विजयी झाले तर प्रभाग तीन मधून अतुल गावडे हे विजयी झाले. आता या दोन्ही प्रभागांचा मिळून प्रभाग सहा निर्माण झाला आहे.
आता या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांच्या भगिनी शबाना शेख यांच्या नावाची चर्चा आरक्षण सोडत झाल्यापासून सुरू झाली आहे. यापूर्वी म्हणजे गेल्या सहा ते सात वर्षापासून या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख हे प्रभागातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांशी जनसंपर्क ठेवून आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याची भूमिका त्याचबरोबर अजातशत्रू स्वभाव वैशिष्ट्य धारण केलेल्या शेख परिवाराने गेल्या अनेक वर्षापासून केवळ हा प्रभागातच नाही तर संपूर्ण शहरात नावलौकिक प्राप्त केला आहे. शबाना शेख यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रभागातील जाणकार मंडळी कामाला लागली आहेत.
चौकट
निवडणुकीसाठी शबाना शेख या इच्छुक असून लवकरच याबाबत सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद, त्यांचा असलेला प्रभावी जनसंपर्क आणि सर्वसामान्यांची त्यांची जुळलेली नाळ या सर्व जमेच्या बाबी गृहीत धरून निश्चितपणे त्यांच्या उमेदवारीचा विचार राजकीय किंगमेकर करू शकतात. त्यांना कोणत्या राजकीय प्रवाहाकडून उमेदवारी मिळणार यापेक्षा त्यांच्या सक्षम उमेदवारीचा आणि त्यांच्या विजयाचा फायदा कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)
0 Comments