मोहोळ शहराच्या नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे नाव आज निश्चित होणार
शितल सुशील क्षीरसागर यांच्याच नावाला वरिष्ठ आणि स्थानिक स्तरावरूनही पसंती
युवा आणि उच्चशिक्षित उमेदवारीलाच भाजपामधून प्राधान्य देण्याची पंरपरा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलाच वेग आला आहे आता कोणत्याही क्षणी मोहोळ शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीची सर्वपक्षीय घोषणा होऊ शकते. मोहोळ आणि अनगर नगर परिषदांची निवडणूक ही ज्येष्ठ नेते तथा किंगमेकर व्यक्तिमत्व असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांच्याच नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोहोळच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा वरिष्ठ स्तरावरून पक्षश्रेष्ठी हे राजन पाटील यांचेच मत विचारात घेऊन निश्चित करणार असल्याचे स्पष्ट आहे.
भारतीय जनता पक्षाकडून प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांच्या सुविद्य पत्नी शितल क्षीरसागर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे.
दोन दिवसापूर्वी त्यांच्या नावाबाबत वरिष्ठ आणि स्थानिक स्तरावरून एकमत होण्याबाबत शंका कुशंकांना काही अदृश्य घटकांच्या धावपळीमुळे वेग आला होता. मात्र कालपासून पुन्हा शीतल क्षीरसागर यांच्याच नावावर एकमत होण्याची शक्यता पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यातून व्यक्त केली गेली. त्यामुळे त्यांचेच नाव कोणत्याही क्षणी फायनल होऊ शकते असे भारतीय जनता पक्षातील अनुभवी आणि जाणकार पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
भारतीय जनता पक्षाचे मोहोळ तालुक्याचे पक्षश्रेष्ठी तथा माजी आमदार आणि किंगमेकर ज्येष्ठ नेते राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या समन्वयकात्मक भूमिकेतून आणि वरिष्ठ पक्ष स्तरावरील सूचनेनुसार पक्षाने वरिष्ठ स्तरावर या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची नावे पाठवली आहेत. त्यामध्ये शितल क्षिरसागर यांनी मुलाखत दिल्यामुळे त्यांच्याही नावाचा समावेश यात आहे. आज कोणत्याही क्षणी मोहोळ नगराध्यक्षपदाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते.
चौकट
प्रभाग सोळाच्या विकासात्मक कायापालठामुळे सुशील यांच्या बद्दल संपूर्ण शहराचे विकासाभिमुख आणि धडपड युवा नेता असे ठाम आणि परिपक्व मत बनले आहे. ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आवर्जून क्षीरसागर परिवाराने त्यांची भेट घेऊन मोहोळच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी देण्याची विनंती केली. सुशील क्षीरसागर यांच्या सुविद्य पत्नी शितल यांची उमेदवारी निश्चितपणे यांनी निवडणुकीत सहज ठरू शकते. क्षीरसागर परिवार हा सातत्याने राजकारणामध्ये प्रगल्भ आणि संयमी कार्यशाळेसाठी प्रसिद्ध आहे. कारण वरिष्ठ स्तरावरील भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे सातत्याने उत्तम समन्वय आणि जनसंपर्क ठेवत त्यांनी वेळोवेळी विशेष निधी खेचून आणत प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य समस्या सोडवले आहेत. त्यामुळे मोहोळ शहरातील सर्वांगीण विकसित प्रभाग कसा असावा ? तर उत्तर येते सुशील भैया क्षीरसागर यांच्या प्रभाग सोळा सारखा असावा. यावरून त्यांचे राजकीय क्षेत्रातील यश लक्षात येते.
चौकट
सुशील भैय्या क्षीरसागर हे गेल्या दहा वर्षापासून मोहोळ शहराच्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात सक्रिय असलेले युवा पदाधिकारी आहेत. त्यांच्या रूपाने क्षीरसागर परिवाराने मोहोळ नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून नगरसेवकपद पहिल्यांदा प्राप्त केले. प्रभाग सोळाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुशील क्षीरसागर यांचे मोठे योगदान आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुभाष बापू देशमुख माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे दक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी ज्येष्ठ आमदार महोदय विजयकुमार देशमुख, आमदार समाधानदादा अवताडे, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, यांच्या संपर्कात राहून सातत्याने पक्ष संघटनात्मक कार्याचे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सही दिशा स्पष्ट नीती या धोरणानुसार क्षीरसागर यांनी आजवर केलेले प्रामाणिक काम यामुळेच मोहोळ शहराच्या राजकारणामध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले युवा नेतृत्व सुशील भैय्या क्षीरसागर हे आहेत.

.jpg)
0 Comments