मोहोळच्या नगराध्यक्ष पदासाठी स्मिता प्रकाश कोकणे यांना संधी देऊन निष्ठेचा सन्मान व्हावा
मोहोळ शहराच्या पूर्व भागातील सर्वसामान्यांची पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षा
बचत गट आणि अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी दिले अतुलनीय आणि उल्लेखनीय योगदान
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राजकीय क्षेत्रामध्ये पक्षनिष्ठेला जितकी किंमत असते तितकी निरपेक्ष भावनेने राजकीय कार्यक्षेत्रात कार्यरत राहण्यालाही असते. याची प्रचिती मोहोळ शहरातील यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी स्मिता प्रकाश कोकणे यांच्या राजकीय वाटचालीवरून जाणवते. मोहोळ नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी झाल्यानंतर सर्वात अगोदर चर्चेत आलेले नाव म्हणजे स्मिता प्रकाश कोकणे स्मिता कोकणे या भाजपचे जेष्ठ किंगमेकर नेते तथा माजी आमदार राजन पाटील महिला मार्गदर्शिका राजश्रीताई राजन पाटील यांच्या निकटवर्तीय समर्थक पदाधिकारी म्हणून संपूर्ण शहर आणि तालुक्याला ज्ञात आहेत स्मिता कोकणे यांनी भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नगराध्यक्ष पदासाठी आपली मुलाखत दिली असून त्यांनी रीतसर पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची देखील मागणी केली आहे.
स्मिता कोकणे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून २००३ पासून आपल्या राजकीय क्षेत्राचाही शुभारंभ केला महिला बचत गटाची स्थापना करण्याबरोबर स्वयंसहाय्यता बचत गट ही सुरू केला. शिवाय आशा वर्कर म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावत बचत गटाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण शहराने पाहिले आहेत. याशिवाय रक्तदान शिबिर वृक्षारोपण शिबिराबरोबर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर त्यांनी ठेवलेला समन्वयकत्मक संपर्क निश्चितपणे सर्वांना दिलासादायक ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अविरतपणे झटणाऱ्या निष्ठावान महिला भगिनीला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी त्यांच्या समवेतच्या अन्य सहकारी महिला सदस्यांची अपेक्षा आहे.
चौकट
मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील परिसरात वास्तव्यास असलेल्या कोकणे परिवाराचे आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षापासूनची निष्ठेचे आणि आपुलकीचे नाते आहे. अत्यंत सुशिक्षित आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा मनमिळावु परिवार म्हणून कोकणे परिवार गेल्या चार दशकापासून सर्वांना परिचित आहे. मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील जनसंपर्क बरोबर या परिवारातील सर्व सदस्यांचा सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक घटकाशी देखील मोठा जनसंपर्क आहे. एक अजातशत्रू आणि सर्वांना आपुलकी प्रदान करणारा निस्वार्थी भावनेने कार्यरत असलेल्या कोकणे परिवारातील सदस्य स्मिता कोकणे यांना नगराध्यक्षपदी निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी त्यांच्या परिवाराबरोबर या शहरातील सर्वसामान्यांचीही मागणी आहे.

0 Comments