प्रभाग आठ मधील धनुष्यबाण चिन्हावरील बंडू देशमुख यांच्या उमेदवारीमुळे ठरलेली समीकरणे बदलणार
शिवसेनेत प्रवेश करत राजकीय क्षेत्रात केलेल्या बंडू देसाईंच्या जोरदार एन्ट्रीची शहरभर चर्चा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात दमदारपणे एन्ट्री करत प्रवेश केलेले बंडू देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवत प्रभाग क्रमांक आठ मधील वातावरण चांगलेच तापवले आहे. आता ते यापूर्वीच्या शिवसेनेबरोबर भाजीपाला देखील टक्कर देण्याच्या तयारीत असल्यामुळे बंडू देशमुख यांची रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे.
यापूर्वीपासूनच प्रभाग क्रमांक आठ मधील जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे आता या पक्षात प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर ते निवडणूक लढवत आहे.
युवा नेते बंडू देशमुख हे या प्रभागातील स्थानिक उमेदवार असून धनुष्यबाण चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवल्यामुळे या प्रभागातील प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणत आहे. सर्वधर्मसमभाव जपण्याबरोबर सर्व समाज घटकांशी अत्यंत निकोप आणि बंधूभावाचे धोरण स्वीकारलेल्या बंडू देशमुख यांच्या या प्रभागातील उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षांना आतापासूनच धास्ती वाटायला लागली आहे.
बंडू देशमुख हे मोहोळ शहरातील दिवंगत ज्येष्ठ मार्गदर्शक शहाजीरावदादा देशमुख यांचे सुपुत्र असून त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य या प्रभागाशी गेल्या अनेक दशकापासूनचा जनसंपर्क कायम ठेवून आहेत. देशमुख परिवाराचे या परिसरातील प्रत्येक सर्वसामान्यांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले बंडू देशमुख यांची राजकीय एन्ट्री या नगरपरिषद निवडणुकीच्या रूपाने झाल्यामुळे आता देशमुख परिवाराने आजतागायत कमावलेली माणुसकी, आपुलकी सर्वसामान्यांचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती या निवडणुकीत त्यांना निश्चितपणे फलदायी ठरणार आहे.
चौकट
या प्रभागातील सर्व धर्माचे समाज बांधव त्याचबरोबर सर्व अन्य समाजघटकांशी बंडू देशमुख यांचा सर्वधर्मसमभाव आणि भाईचारा स्वरूपाचा आपुलकीचा भावबंध आजही कायम आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांशी सल्लामसलत करूनच बंडू देशमुख यांनी या प्रभागातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. स्थानिक उमेदवारीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायचीच अशी घोषणा यापूर्वीच बंडू देशमुख यांनी केली होती. त्यामुळे बंडू देशमुख यांचे समर्थक आरक्षण सोडती पासूनच या प्रभागात कामाला लागले आहेत. त्यामुळे बंडू देशमुख यांच्या प्रचाराची पहिली फेरी आता जवळपास पूर्ण होत आली असून दुसऱ्या फेरीमध्ये ते कॉर्नर बैठकांबरोबर मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधणार आहेत.
.jpg)
0 Comments