अकलूज येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

अकलूज येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न

 अकलूज येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप,यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व बालविकास केंद्र,श्री मल्लिकार्जुन मंदिर, रामायण चौक,अकलूज यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप व यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 
             या सप्ताहाची सुरुवात बुधवार दि.८ रोजी ग्रामदेवतेचा मान-सन्मान करून भक्तिभावात करण्यात आली.दि.९ ते १५ या कालावधीत दिवस-रात्र प्रहर सेवेद्वारे अखंड श्री स्वामी समर्थ नामस्मरण करण्यात आले.तसेच दररोज सकाळी ८ वाजता, सकाळी १०.३० वाजता व सायंकाळी ६ वाजता तीन वेळा आरती व महानैवैद्य आरती पार पडत होती.या सप्ताहात श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती,श्री मल्हार सप्तशती,श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण,औदुंबर प्रदक्षिणा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच श्री गणेश याग,श्री स्वामी याग,मनोबोध याग,चंडी याग,रुद्र व मल्हारी याग तसेच गीताई याग यांसारखे विविध यज्ञ विधी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
              स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या दिवशी श्री स्वामी महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यात बालसेवेकरी विशेष आनंदित झाले होते व त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या उपक्रमात बाल सेवेकऱ्यांचा विशेष सहभाग लाभला असून सर्व स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे संपूर्ण सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला. पुण्यतिथीनिमित्त आयोजित महाआरती अकलूजच्या नगराध्यक्ष सौ.रेश्मा आडगळे व त्यांचे पती लालासो आडगळे यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न झाली.
               या सप्ताहातील सर्व सेवा विनामूल्य होत्या.विशेषतः प्रश्न-उत्तरे सेवा भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. तसेच प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages