सोलापुर (कटूसत्य वृत्त):- यात हकीकत अशी की, मौजे कंदलगांव ता.द. सोलापुर, जिल्हा - सोलापुर येथील शेतजमीन गट नंबर ३५९ / २ / अ ही शेतजमीन आण्णाप्पा गाडेकर, कमला गाडेकर, संगीता गाडेकर यांच्याकडुन म्हाळप्पा व्हनमाने, आण्णाराव व्हनमाने, चतुराबाई व्हनमाने यांनी कायमखुषखरेदीखताने घेतलेली होती. तदनंतर सदर गाडेकर कुंटुबियांनी सोलापुर येथील मे. सावकारांचा निंबधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कोर्टात वर नमुद शेतजमीनीबाबतचा झालेला व्यव्हार हा सावकारीचा व्यव्हार असल्याचे भासवुन सदर व्यव्हार हा रदद होण्याकामी महाराष्ट्र सावकारी अधिनियम चे कलम १८ अन्वये दावा दाखल केलेला होता. सदरचा दावा हा मे. सावकारांचे निंबधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापुर यांनी दिनांक १२/०२/२०२६ रोजी मंजुर करुन वर नमुद शेतजमीन ही गाडेकर कुंटुबियांना परत केलेली होती.
तदनंतर सदर यातील व्हनमाने कुंटुबियांनी वर नमुद आदेशाविरुध्द पुणे येथील मे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचे कोर्टात अॅड सोमनिंग शावरसिध्द पुजारी यांचे मार्फत अपील दाखल करुन दाद मागितलेली होती. सदरकामी व्हनमाने यांचेवतीने केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन सदर वर नमुद शेतजमीन गट नंबर ३५९ / २ / अ बाबत मे. सावकारांचे निंबधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापुर यांनी पारित केलेला आदेश रदद करत सदरचे प्रकरण पुन्हा एकदा फेर चौकशी कामी पाठविण्याचा न्यायनिर्णय पुणे येथील मे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी दिनांक ०९/०४/२०२६ रोजी पारित केलेला आहे. सदर निकालामुळे व्हनमाने परिवारास दिलासा मिळालेला आहे. सदरकामी म्हाळप्पा व्हनमाने, आण्णाराव व्हनमाने, चतुराबाई व्हनमाने यांचे मार्फत अॅड सोमनिंग शावरसिध्द पुजारी, अॅड विजय बिराजदार, अॅड प्राजक्ता पुजारी, अॅड अभिषेक देवकते, अॅड शुभांगी हजारे, अॅड दिपक सोनवणे, अॅड रुपाली भासगी यांनी काम पाहिले.
.jpeg)
No comments:
Post a Comment