कुरनूर येथे पूरग्रस्तांना कीट वाटप,आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचा मदतीचा हात. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 23, 2025

कुरनूर येथे पूरग्रस्तांना कीट वाटप,आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचा मदतीचा हात.

 कुरनूर येथे पूरग्रस्तांना कीट वाटप,

आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचा मदतीचा हात.

कुरनूर(कटूसत्यवृत्त):-पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या पुढाकारातून आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे,आनंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सरला जी रेवगडे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.यावर्षी अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अनेक सामाजिक संघटना संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत अशातच पुणे जिल्ह्यातील कुरुळी, तालुका खेड पुणे येथील आनंद मेडिकल फाउंडेशनच्या स्कूलने कुरनूर येथे येऊन पूरग्रस्तांच्या घरांची पाहणी करून त्यांना संसार उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले यामध्ये गहू,बाजरी, ज्वारी, साखर, यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यासाठी संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल काळे यांनी देखील अनमोल मदत केली.तत्पूर्वी मुख्याध्यापिका रेवगडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शाळा ही समाजाचे प्रतिबिंब असते म्हणून समाजाचे ऋण व्यक्त करण्याची वेळ आली तर शाळा सदैव तत्पर असते.पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला मदत करत आहोत यापुढे देखील आमची संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असेल असे म्हणाले यानंतर प्रास्ताविक करताना बाळासाहेब मोरे यांनी आनंद इंग्लिश स्कूलच्या कार्याचे कौतुक करून गावाला येऊन भेट देऊन किट वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी सर्व ग्रामस्थ पुरग्रस्त बाधित नागरिक उपस्थित होते तसेच शाळेच्या पालक संघटनेचे संतोष कानूरकर, रवी गवारे, शिरीष कड, मनोज बागडे, संतोष येळवंडे, दिनेश कड, निलेश कड, श्रीशैल्य बबलाद, सत्यवान वाडेकर हे पालक सभासद उपस्थित होते समवेत  आदित्य वाजे, रेश्मा लांडगे, दिपाली फरांदे शिक्षक देखील उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages