वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीपोटी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 2, 2025

वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीपोटी

 वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीपोटी

मिळणार हेक्टरी ४० हजारांची मदत
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ४ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अजूनही पिके पाण्यात असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली असून अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली. पुरामुळे जिल्ह्यातील ९२ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर अधिक वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून ५९ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात सलग पाच दिवसांहून अधिक काळ पाण्यात असलेल्या उसाचे पंचनामेही करण्यात येत आहेत.. यासाठीही राज्य शासनाकडून फळबागायतीच्या नुकसानीप्रमाणे मदत मिळण्याची शक्यता आहे. आला आहे. महसूल खात्याकडून पंचनामे करण्यात येणार आहेत. या निधीचे वितरण लवकरच पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. यात ५६ हजार ९०० शेतकऱ्यांनानुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदत देण्यात आली आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीपोटी ८ हजार ५०० बागायती पिकांसाठी १६ हजार ५०० तर फळपिकांसाठी २० हजार ५०० रुपयांची हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येत आहे. पुरामुळे सहा तालुक्यांतील गावातील पिकांचे मोठे नुकसानझाले आहे. यात सर्व पिकांचे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांसह जमीन, अन्य कृषी यांत्रिकी औजारे यांच्या नुकसानीचे तपशीलही घेण्यात येत आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या सर्व नुकसानीपोटी मदत देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages