शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतले पालख्यांचे दर्शन
आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे घेतले दर्शन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी वारी येत्या 25 जुलै 2026 रोजी अजून त्यानिमित्ताने अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील लाखो वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी वारीसाठी येत असतात त्याचबरोबर राजकीय नेते आमदार खासदार मंत्री व शासकीय अधिकारी हे ही वारकऱ्यांच्या सोयी सुविधा पाहण्यासाठी पंढरीत येत असतात त्याच अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ही आज 18 जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर आले होते शिर्डी पासून पंढरपूर पर्यंत येणाऱ्या सर्व दिंड्या ची भेटी घेत व वारकऱ्यांचे दर्शन घेऊन चौकशी करत पंढरपूर पर्यंत आलो असून पंढरीच्या पांडुरंगाला शेतकरी सुखी समृद्धी होऊ दे व बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण असू दे हीच मागणी करणार आहे असेही त्यांनी सांगितले पंढरीच्या वारीची परंपरा पूर्वीपासून आमच्या घरात आहे त्यामुळे दरवर्षी पंढरीला येतोच आणि यावेळी शिर्डी होऊन पंढरपूरला येत असताना सर्व दिंड्या व दिंडी प्रमुखांच्या भेटी घेऊन अडचणी जाणून घेतल्या महाराष्ट्र सरकार ही अतिशय उत्कृष्ट काम करत असून अनेक दिंडींना प्रत्येक वीस हजार रुपये अनुदान देते पण तेही अनुदान वाढवून द्यावं यासाठी ही सरकारकडे प्रयत्न करीन आणि शिर्डी ते पंढरपूर पर्यंत येत असताना वारकऱ्यांना ज्या ज्या सुविधा मिळत आहेत त्याही पाहिल्या व आणखी लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत तसेच वारी कालावधी पालखी मार्गावरील वाहतूक व इतरत्र वळवून फक्त वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग खुला व्हावा यासाठी ही सरकारकडे मागणी करणार आहे अशीही त्यांनी यावेळी सांगितले


No comments:
Post a Comment