जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

 जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार




 सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची दक्षता; हजारो भाविकांचा सहभाग
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-  जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे नीरा स्नान आज अत्यंत भक्तिभावात व सुरक्षितपणे पार पडले.  
यावेळी नीरा नदी पात्रात सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बोट पथक तैनात होते. तसेच स्नानावेळी प्रशिक्षित बचावकर्मी पाण्यात सज्ज होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.  

नदी पात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा दक्ष होती. हजारो भाविकांनी नीरा स्नानासाठी नदी पात्रात गर्दी केली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस व स्वयंसेवकांच्या समन्वयामुळे स्नान सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.  
   पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नीरा स्नान हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. यामध्ये  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी व निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांचे सुनचेनुसार स्वतः उपस्थित राहून नियोजन केले. यामध्ये सारथी यूथ फाउंडेशन सोलापूर, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी, ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि हेल्पिंग हॅण्ड रेस्कु फाउंडेशन, शिरढोण, ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages