माझा शिक्षक दिन .....
(कटूसत्य वृत्त):- महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील शाळेला आज भेट देऊन महात्मा फुले व सावित्रीबाई यांना अभिवादन करून आज मी शिक्षक दिन साजरा केला..
५ डिसेंबर १८४८ रोजी ही मुलींची शाळा सुरू झाली होती.. सावित्रीबाई फुले शाळा सुरू होताना एक महिना या गावात थांबून शाळेकडे त्यांनी लक्ष देणे
त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांची आठवण आणि कृतज्ञता हाच खरा शिक्षक दिन आहे.
शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम सुरू होता..त्यात सहभागी झालो.. मुलींना गाणे म्हणून दाखवलं..लहान मुलींनी माझ्या व शिक्षिकांच्या अंगावर फुले टाकली...
ज्यांनी शाळा काढली त्यांच्या अंगावर शेण टाकले होते..त्याच महाराष्ट्रात त्याच सावित्रीबाई यांनी काढलेल्या शाळेत महिला शिक्षकांच्या अंगावर फुले पडतात हा काव्यात्म न्याय आहे..
.सोबत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष सुधाकर डुंबरे व शिक्षक रविंद्र डुंबरे होत
हेरंब कुलकर्णी

.jpeg)
No comments:
Post a Comment