श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन, 'द फोक आख्यान' व सांस्कृतिक कार्यक्रमास महापौर विनायक दादा कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 24, 2026

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन, 'द फोक आख्यान' व सांस्कृतिक कार्यक्रमास महापौर विनायक दादा कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन, 'द फोक आख्यान' व सांस्कृतिक कार्यक्रमास महापौर विनायक दादा कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती





सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन तसेच गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन, 'द फोक आख्यान' व सांस्कृतिक कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी सौ. धनश्रीताई कोंड्याल याही उपस्थित होत्या.


कार्यक्रमापूर्वी महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल व सौ. धनश्रीताई कोंड्याल यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतले.


त्यानंतर महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांनी श्री स्वामी समर्थांच्या सेवाभाव, श्रद्धा आणि अध्यात्माचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमुळे समाजात अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्याचे त्यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल राजे भोसले यांनी महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल तसेच सौ. धनश्रीताई कोंड्याल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.


या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मसंकीर्तन, 'द फोक आख्यान' आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages