अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची
माहिती शासनाला पाठविणार : आयुक्त
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणार
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील आपनी व्यवस्थापन आराखडा तयार
करण्याची कार्यवाही सुरू आहे. नदी आणि नाले प्रवाहाची मोजणी करून याबाबतची सर्वकष माहिती येत्या दहा दिवसांत संकलित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शहरात रस्ते, ड्रेनेजसह इतर नागरी सुविधांच्या नुकसानीची माहिती शासनाला पाठविण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार शहरातील नागरी सुविधांच्या नुकसानीची माहिती शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले,
सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील नदी, नाले, पावसाळी नाले यांची प्रत्यक्ष तपासणीआणि मोजणी करण्यात येणार
आहे. यापूर्वीच नदी, नाले ह रेखांकनाचे काम अंतिम टप्यात आले आहे. शहरातील सर्व नाले प्रवाहाची माहितीही दहा दिवसांत मोजणी करून संकलित करण्यात येणार आहे. मोजणी व आराखडा तयार केल्यानंतर नदी, नाले प्रवाहात अडथळा ठरणारे आणि अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे. फायनल लेआउट असले तरीही ज्या ज्या ठिकाणी पाणी निचरा करण्याची व्यवस्था होत नाही तसेच नदी, नाले प्रवाहात अडथळा निर्माण झाले आहेत, असे अडथळे आणि अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. शहरातील अदिला नदी आणि शेळगी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.
वसंत विहार परिसरातील सहा कमानी येथील ब्रिटिशकालीन नाला मार्ग खुला करण्यात येणार आहे. त्या संदर्भात १८७८ पासूनची सर्व माहिती घेण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या काळात नदी, नाले व इतर पाणी प्रवाहात अडथळे येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
0 Comments