आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
नाशिक : (दि.०२) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रपीता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी युनानी अभ्यास मंडळाचे पदधिकारी उपस्थित होते तसेच श्री. संदीप राठोड, श्रीमती शिल्पा पवार, श्री. वाय.जी. पाटील, श्री. प्रशांत पवार, श्री. विजय कुरकुरे, श्री. राजेश इस्ते, श्री. पुष्कर त`हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. किशोर गांगुर्डे, श्री. सचिन बोरसे, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments