Hot Posts

6/recent/ticker-posts

ना.राजन पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळेच लोकनेते जिल्ह्यातील यशस्वी कारखाना : मोरे

 ना.राजन पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळेच लोकनेते जिल्ह्यातील यशस्वी कारखाना : मोरे


लोकनेते कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ना. राजन पाटील यांची धोरणात्मक निर्णयक्षमता आणि साखर कारखानदारीतील गाढा अभ्यास यामुळे लोकनेते कारखाना आज यशस्वीरित्या २२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन करत आहे. ऊस उत्पादकांचा विश्वास वाढविण्याबरोबरच कारखान्यास अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांमध्ये देखील लोकनेते कारखान्याने आपली विश्वासार्हता आणि पत निर्माण करत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील गौरवशाली कारखानाम्हणून मिळवलेला नावलौकिक
निश्चितपणे जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी अनगर येथे काढले.
लक्ष्मीनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामासाठी बॉयलरचे अग्नि प्रदीपन श्रीकांत मोरे व त्यांच्या पत्नी शोभा मोरे यांचे हस्ते संपन्न झाले. प्रारंभी नरखेड (ता. मोहोळ) येथाल ऊस उत्पादक शेतकरी चंद्रकांत मोटे व त्यांच्या पत्नी विद्या मोटे या उभयतांनी
सत्यनारायण पूजा करून अग्निचे पूजन केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते.
प्रास्ताविकात कारखान्याचे यशवंत माने, माजी आमदार मोहोळ चेअरमन बाळराजे पाटील म्हणाले, मागील हंगामात दोन हजार आठशे रूपयांचा दर जाहीर करून तेवढा सभासदांना त्यांच्या बँक खात्यावर अदा देखील केला आहे. लोकनेते कारखाना हा दिलेला शब्द खरा करणारा कारखाना आहे. येत्या
गळीत हंगामात साडे नऊ लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार असून पूराने बाधीत झालेला ऊस प्राधान्याने गाळपास आणला जाईल. हार्वेस्टरची खरेदी करणाऱ्यास बारा कोटी रुपये बिनव्याजी दिले
आहेत.
व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील,राजश्री पाटील, डॉ. विशाखा फाळके-पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, नाना डोंगरे, जालींदर लांडे, शहाजी गुंड, प्रकाश चवरे, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, संभाजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे, एसबीआय बँकेचे अधिकारी काटकर, मोहोळचे शाखा अधिकारी उत्तमराव बदाले, पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते. प्रकाश चवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
चौकट 
लोकनेते कारखान्याने पत निर्माण केली
लोकनेते कारखाना ऊस उत्पादकांच्या विश्वासाच्या पाठबळावर हा कारखाना तालुक्यातील सर्वाधिक गाळप करणारा कारखाना ठरला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत देखील केली आहे. आज राज्यातील अनेक कारखानदार वित्त साह्यासाठी बँकांकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक बँका लोकनेते कारखान्याला गळीत हंगामासाठी कर्ज देण्यासाठी पुढे येतात. कारण संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांनी सुरुवातीपासून अत्यंत काटेकोर आणि कर्तव्य कठोर भावनेतून वित्त नियोजन करत लोकनेते कारखान्याला कर्जमुक्त करण्याबरोबर आसवणी आणि सहवीज निर्मितीमध्ये देखील अग्रेसर ठेवले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments