सोलापुरात सकल धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन; दीपक बोराडे यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):– धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ प वर्गातून तातडीने अंमलात आणावा, या मागणीसाठी सोलापुरात आज सकल धनगर समाजाच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मागील १५ दिवसांपासून मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असून, शासनाने त्वरित या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी मागणी समाजाकडून होत आहे.
सोलापुरातील विविध ठिकाणी आंदोलन झाले असून, प्रामुख्याने १३ मैल जुना हैदराबाद नाका, पुणे हायवे, बाळे येथे मोठ्या संख्येने धनगर बांधव एकत्र आले आणि रास्ता रोको करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
या आंदोलनाला काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, भारतीय जनता पार्टीचे परिवहन सदस्य राजू पाटील, तसेच शेखर बंकाळे, मनीषा माने, सुजित खुर्द, मनोज सलगर, सागर धायगुडे, अमोल कारंडे, आकाश भगवत, चंद्रकांत यमगर, माय सोलापूर संघटनेचे महेश गाडेकर आदींची उपस्थिती होती.
धनगर समाजाच्या मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा समाजनेत्यांनी दिला आहे.
0 Comments