Hot Posts

6/recent/ticker-posts

पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप

 पूरग्रस्तांसाठी उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाकडून मदत साहित्याचे वाटप


 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षसोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या या उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले असूनपूरग्रस्तांच्या तातडीच्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 
वाटपाचा तपशील पुढीलप्रमाणे :
 
डोणगाव ग्रामपंचायत कार्यालय : चादर 75, सतरंजी 50, टॉवेल 75, नॅपकिन 75, राजगीरा लाडू 10 पाकिटपाणी बॉटल 36
पाथरी ग्रामपंचायत कार्यालय : चादर 100, टॉवेल 100, नॅपकिन 100, राजगीरा लाडू 10, पाणी बॉटल 36, कुर्ती 100
नंदूर ग्रामपंचायत कार्यालय : चादर 45, सतरंजी 45, टॉवेल 45, नॅपकिन 45, राजगीरा लाडू 10, पाणी बॉटल 36
बेलाटी ग्रामपंचायत कार्यालय : चादर 30, सतरंजी 30, टॉवेल 30, नॅपकिन 30, राजगीरा लाडू 10
कवठे ग्रामपंचायत कार्यालय : चादर 20, सतरंजी 20, टॉवेल 20, नॅपकिन 20, राजगीरा लाडू 10, पाणी बॉटल 36
समशापूर ग्रामपंचायत कार्यालय : चादर 60, सतरंजी 60, टॉवेल 60, नॅपकिन 60, राजगीरा लाडू 10, पाणी बॉटल 36
तेलगाव (उत्तर सोलापूर) : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
 
या उपक्रमातून पूरग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा मिळत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments