Hot Posts

6/recent/ticker-posts

जय शिवराय प्रतिष्ठानकडून ४१ शेतकरी कुटुंबांना मदत

 जय शिवराय प्रतिष्ठानकडून ४१ शेतकरी कुटुंबांना मदत




बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये झालेल्या भीषण पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाला आहे अशा अतीबादीत नुकसानधारक शेतकरी कुटुंबांना जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्तव्य निधीच्या माध्यमातून ३८ कुटुंबांना रोख स्वरूपामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये कर्तव्य निधी व आत्महत्याग्रस्त तीन कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख कर्तव्य निधी तहसीलदार एफ आर शेख ,माजी गट नेते विजय (नाना) राऊत, पोलीस निरीक्षक  बालाजी कुकडे, इंजिनीयर आकाश नलवडे, बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष मोळवणे,माजी उपसभापती अविनाश मांजरे, स्मार्ट अकॅडमीचे प्रमुख सचिन वायकुळे, मा गटनेते दीपक राऊत, अमृत नाना राऊत, पोद्दार स्कूल संचालक संदीप बरडे, मा नगरसेवक मदन गव्हाणे, मा नगरसेवक संतोष बारंगुळे, मा नगरसेवक विजय चव्हाण,दीपक रोंगे, माजी सरपंच पंडित मिरगणे, सरपंच प्रदीप नवले, हनुमंत धस,सौ शैलजा गीते,धनाजी पवार,निलेश पवार,युवराज ढगे,सूरज चंदनशिवे, हनुमंत जगदाळे,रावसाहेब यादव, हेमंत सावंत,  प्रशांत नागरगोजे,महेश देशमुख,अजय पाटील,अजित बाबर, सागर गरड आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान होत आहे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांकडे सध्या कोणताच आर्थिक पर्यायी उपलब्ध नसल्याकारणाने तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषणता प्रचंडपणे दिसत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सरकार ज्यावेळेस मदत करेल त्यावेळेस करेल परंतु आत्ता रोजच आयुष्य जगण्यासाठी देखील उपलब्ध नसलेल्या पैशांचा विचार करून जय शिवराय प्रतिष्ठानने बार्शी शहर आणि तालुक्यातील सात गावांमधील ३८ अल्पभूधारक अति नुकसानधारक अतिबाधीत जनावरांची ज्यांची हानी झाली आहे व जे आर्थिक संकटात सापडले आहेत अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली आहे व ही मदत देत असताना बार्शी शहर आणि तालुक्यातील व इतर ठिकानातील शेतकऱ्यांना आव्हान केला आहे की आपण कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याच्या आधी आपल्या संकट समय आमच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर बार्शी शहराने तालुक्यातील इतर सामाजिक राजकीय संघटनांना देखील मदतीस पुढे येऊन हे संकट एकत्र येऊन दूर करण्याचा आव्हान देखील संघटनेच्या वतीने करण्यात आला याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी व शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये शेतकरी हेल्पलाइन काढण्याची देखील भावना यानिमित्ताने करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचा आयोजन मराठा मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते या रोख स्वरूपातील रक्कम दिल्यामुळे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये समाधान दिसून येत होता येणाऱ्या काळात देखील शक्यतो तेवढी मदत करण्याचं भावना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली कार्यक्रमासाठी परिश्रम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्तव्य निधी समिती प्रमुख किरण कोकाटे ॲड गणेश हांडे विशेष निधी गोळा करण्यासाठी सौ शैलजा गीते सारा मुल्ला मॅडम यांनी प्रयत्न केले  तर जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य विजय राऊत गणेश पन्हाळकर अमोल वाणी यश कदम नागराज सातव,सुरज वाणी अमित नागोडे विनीत नगोडे ॲड आकाश तावडे विनायक हांडे सुहास गुंड संकेत वाणी अविनाश वैद्य मॉन्टी पौळ शुभम चव्हाण, अमित नागोडे कृष्णा परबत अमित चव्हाण वैभव विधाते  सुस्मित बागल ओम सुरवसे कमलेश कोटगुंड आधी सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments