Hot Posts

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त शिक्षकांकडून चार्‍याची मदत

 सेवानिवृत्त शिक्षकांकडून चार्‍याची मदत  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अतिवृष्टी, पुरामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्या कुटुंबांना अन्नधान्य किट आणि बाधित जनावरांना चार्‍याचे वाटप महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेकडून करण्यात येणार आहे. सीना, भीमा नदीच्या रौद्ररूपामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावातील शेतकरी, शेतमजुरांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पिके पाण्याखाली गेल्याने मुक्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक, सेवेत कार्यरत शिक्षकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचे चारा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली आहे.

पूरग्रस्त गावातील माणसांना अन्नधान्य किट्स सरकार सेवाभावी संस्था शेजारील गावानी पुरवत आहेत. परंतु शेतजमीन पाण्याखाली गेल्याने जीतरूप जनावरे उपाशीपोटी राहात आहेत. याचा विचार करून सेवानिवृत्त शिक्षक, सेवेतील शिक्षक एकत्र येऊन पशुधन बचाव उपक्रम हाती घेतले आहे.

यासाठी रमेश गायकवाड, कुंदा राजगुरू, काळप्पा सुतार, सुभाष फुलारी, बादशहा मुल्ला, सिध्दाराम विजापूर, शिवाजी पाटील, दयानंद वठारे, सिद्राम कटगेरी, मल्लीनाथ पुजारी, बालाजी गुरव, शिवानंद बिदरकोटे संजय देवकाते, रामचंद्र काळे, मल्लिकार्जुन पडदा आदींनी सहकार्य केले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी मदत तर केलीच; पण जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न बिकट असल्याचे पाहून चारा मदत करण्याचे निश्चित केले. संघटनेच्या मदतीने दोन लाखांचा चारा मदतीसाठी देण्यात येणार आहे.

शिवानंद भरले, राज्यअध्यक्ष, सेवानिवृत्त शिक्षक संघजिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संस्थेकडून बाधित कुटुंबांची सर्व सोयीसुविधा करण्यात येत आहे. मात्र, हजारो जनावरे चाराविना राहत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेकडून दोन लाख रुपयांचा चारा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments