शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे— दिलीप माने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे— दिलीप माने

 शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवावे— दिलीप माने




साने गुरुजी पतसंस्थेचा पुरस्कार सोहळा संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिक्षकांनी बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज रहावे.बदलते तंत्रज्ञान आत्मसात करुन आपले ज्ञान  अद्यावत ठेवावे.त्याचा वापर विद्यार्थी हितासाठी करावा.असे मत सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा अरकाल गार्डन येथे पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर गुरुनाथ वांगीकर, राम गायकवाड,आप्पासाहेब पाटील,सोमेश्वर याबाजी,अनिल गायकवाड,राजेंद्र कुलकर्णी,अ.गफुर अरब,वल्लभ चौगुले आदी उपस्थित होते.शिक्षण प्रक्रीयेत शिकणे व शिकवणे ही प्रक्रीया सतत चालु असली पाहीजे.असे ही मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी उपक्रमशील मुख्याध्यापक हेमावती मिठ्ठा,गुणवंत शिक्षक किरण साळुंके,आफ्रीन तारानाईक सेवाभावी सेवक नेताजी रणपिसे तर वि.मो.मेहता शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन मुरलीधर कडलासकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव आप्पाराव इटेकर,जयंत गायकवाड,महादेवी पाटील,विरभद्र यादवाड,सुनिल चव्हाण,भिमराया कापसे,सचिन चौधरी,भाऊसाहेब मोरे,उल्हास बिराजदार,धनाजी मोरे, शिवानंद हिरेमठ व फरजाना रचभरे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन चौधरी यांनी तर सुनिल चव्हाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages