मनोरमा मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

मनोरमा मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन

 मनोरमा मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयाचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा मल्टीस्टेट को ॵपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी च्या इंदिरा नगर विजापूर रोड सोलापूर येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडले. 
     त्यावेळी रणजितसिंह मोहिते म्हणाले की, सहकार क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. त्यानुसार बदल स्वीकारून कामाची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. मनोरमा परिवाराचे सूत्रधार श्रीकांत मोरे व शोभा मोरे हे अत्यंत कुशल मार्गदर्शक आहेत. ते सहकार क्षेत्रातील अभ्यासक देखील आहेत. त्यामुळे हा परिवार प्रगती पथावर आहे. शिवाय ही नुतन वास्तू सहकार क्षेत्राच्या वैभवात भर टाकेल आम्ही सदैव सोबत राहू असे सांगून मनोरमा परिवाराच्या वाटचालीचे कौतुक केले.
     श्रीकांत मोरे म्हणाले की, मोहिते पाटील व मनोरमा परिवार  सहकार क्षेत्राच्या विकासाची गंगा नेटाने पुढे नेण्याचे काम करेल. दोन्ही घराण्याचे ऋणाबंध पुढची पिढी कायम ठेवतील असा आशावाद व्यक्त केला. माजी शिक्षणाधिकारी प्रदिप मोरे यांनी मोरे व मोहिते पाटील यांच्यातील तीन पिढ्याचे सौख्य असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रात देखील मोहिते पाटला च्या मार्गदर्शनात मला चांगले काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. 
    मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे यांनी मनोरमा  मल्टीस्टेट च्या एकंदरीत व्यवसायाच्या प्रगतीचा  आलेख मांडला. मल्टीस्टेट च्या सीईओ कविता कुलकर्णी यांनी मान्यवराचे स्वागत केले.
   यावेळी डॉक्टर सुमित मोरे यांनी मनोरमा परिवाराच्या भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कामाची व्याप्ती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड.सुरेश गायकवाड यांनी केले तर आभार व्हाइस चेअरमन  सुरवसे यांनी मानले .
    या शानदार सोहळ्यास मनोरमा बॅन्क व मल्टीस्टेट चे संचालक डॉ. ऋचा मोरे पाटील, डॉ. मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, राजकुमार खरटमोल, दत्ता मुळे , सुहास भोसले, अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले , गजेंद्र साळुंखे,मनोरमा च्या सि.ई.ओ. शिल्पा मोहिते, कमलाकर पुजारी, निलकंठ करंडे , सुनिल पाटील, माजी उपमहापौर प्रविण डोंगरे आदींसह ठेवीदार कर्मचारीh सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages