न्यासाकडून अत्यंत अप्रतिम योजना आणि सेवा- आरोग्य अधिकारी डॉ. जुही पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

न्यासाकडून अत्यंत अप्रतिम योजना आणि सेवा- आरोग्य अधिकारी डॉ. जुही पवार

 न्यासाकडून अत्यंत अप्रतिम योजना आणि सेवा- आरोग्य अधिकारी डॉ. जुही पवार





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून अत्यंत अप्रतिम योजना आणि सेवा स्वामी भक्तांना दिली जात असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल (स्टेशन) नजीक असलेल्या शासनाचे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कु. जुही पवार यांनी व्यक्त केल्या.


त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या  बोलत होते. त्यांच्या समवेत डॉ. किरण पवार, गौरव पवार (जळगाव) हे उपस्थित होते.

यावेळी शहाजी यादव, शुभम सावंत, सतीश महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, एस के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages