अक्कलकोटमध्ये ढगफुटीमुळे शेती-पिकांचे प्रचंड नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

अक्कलकोटमध्ये ढगफुटीमुळे शेती-पिकांचे प्रचंड नुकसान

 अक्कलकोटमध्ये ढगफुटीमुळे शेती-पिकांचे प्रचंड नुकसान




खा. प्रणिती शिंदे यांची पूरग्रस्त भागात पाहणी


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी मोट्याळ आणि शिरवळवाडी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळ येथील तलावांना तातडीने भेट देऊन पाहणी केली.

अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ व शिरवळवाडी येथील तलावांच्या आजूबाजूची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने सरसकट पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शासनाकडे केली.

पूरग्रस्त ग्रामस्थांना धीर देताना त्या म्हणाल्या, “मी सदैव आपल्या पाठीशी आहे.” तसेच काही ग्रामस्थांची घरे पाण्याखाली गेल्याने त्यांना शासनाने विशेष घरकुल योजना मंजूर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या दौऱ्यावेळी त्यांच्या सोबत तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, शिवानंद बिराजदार, युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत कवडे, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष हर्षदीप गायकवाड, संजय प्रचंडे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गजानंद जकीकोरे, नागनाथ कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages