अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या..

 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या..




 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात झालेल्या महाभयंकर पावसामुळे, शहरातील सकल भागात व झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. व मोठ्या प्रमाणात कौटुंबिक आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व शहरातील सर्व झोपडपट्ट्यात आरोग्यसेवा वाढवावी., अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले आहे.
       मा. महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात, संपूर्ण सोलापूर शहरात ११ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील सकल भागात व सर्व झोपडपट्ट्यात  जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे., पाऊस इतका मोठ्या प्रमाणात झाला आहे की सोलापूर शहरात सर्वत्र व झोपडपट्टी भागात पाणीमय होऊन गटारी शौचालय व सांडपाणी एकत्रित येऊन संपूर्ण सोलापूर दुर्गंधीयुक्त झाले आहे. एकीकडे सध्या दूषित प्रदूषण त्यात भर म्हणून आजार मोठ्या प्रमाणात वाढत  आहेत., घराघरात, आमरस्त्यावर झोपडपट्ट्यात पाणीच पाणी झाले आहे. यापूर्वीही मैला मिश्रित पाण्यामुळे जगजीवनराम झोपडपट्टीत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे निधन झाले आहे. ते सुरळीत होते की नाही, इतक्यात या पावसाने थैमान माजविले आहे.
     तरी माननीयांनी  निवेदनातील सर्व बाबींची दखल घेऊन, योग्य ते उपाय करून सोलापूर शहरवासी यांचे जीव वाचवावे., असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 प्रमुख मागण्या
१. सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन योजनेअंतर्गत कामकाज सुरू करावे २. झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित करावे. ३. साचलेले पाणी हटविण्यासाठी उपाययोजना कराव्यात  ४. परत पाऊस आला तरी पाणी साचू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. ५. लहान मुलांच्या आरोग्यासाठी चलता दवाखाना वाहन संपूर्ण शहरात फिरविण्यात यावे  ६. ठिकठिकाणी आपतग्रस्त संदेश देण्याकरिता स्वयंचलित यंत्रणा सुरू करावी  ७. अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. ८. श्री छत्रपती शिवाजी सर्व उपचार रुग्णालयात अतिवृष्टीग्रस्त लोकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा. अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
        विष्णू कारमपुरी (महाराज) व श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, रूपाली मिरगाळे,  गीता  भागवत, बालमनी गजेली,  सुवर्णा कोमाकुल, मीनाक्षी मुषण,  अर्चना पाटील, ललिता येलका,
व्यंकटेश कोंगारी, पद्मा साका , वंदना गुत्तीकोंडा,  रेणुका मच्छा, भाग्यलक्ष्मी श्रीमल, पद्मावती सग्गम, सपना चंदनशिवे, गिताबाई ईरागंटी,अंबिका माने स्वाती शिंदे, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, शरणाप्पा जगले यांच्यासह मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages