सुरेश पाटोळे यांना समाज भूषण पुरस्कार घोषित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

सुरेश पाटोळे यांना समाज भूषण पुरस्कार घोषित

 सुरेश पाटोळे यांना समाज भूषण पुरस्कार घोषित




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा समाज भूषण पुरस्कार सोलापूर येथील मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते ,क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य, सुरेश पाटोळे यांना घोषित करण्यात आला आहे. 
        सुरेश पाटोळे हे मागील २५ वर्षापासून मातंग समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी  निस्वार्थीपणे काम करत आहेत. त्यांनी लष्कर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. सोलापूर शहरात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा  पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी सुरेश पाटोळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. सुरेश पाटोळे दरवर्षी मोफत आरोग्य शिबिर, नेत्र रोग तपासणी आणि शस्त्रक्रिया  शिबिर सामुदायिक विवाह सोहळा यांचे आयोजन करतात. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या राज्यव्यापी चळवळीत ते सक्रिय आहेत. मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध   निवेदने,मोर्चे आणि आंदोलने यांच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
    त्यांच्या कामाची दखल घेऊन इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट,नवी मुंबई या संस्थेने त्यांना यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार देण्याचे घोषित केला आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख २१०० -/- असे आहे. ही घोषणा संस्थेचे अध्यक्ष   दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा २० सप्टेंबर 2025 रोजी  विष्णुदास भावे सभागृह, वाशी,नवी मुंबई येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages