प्रताप क्रीडा मंडळाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

प्रताप क्रीडा मंडळाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

 प्रताप क्रीडा मंडळाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न




 अकलूज (कटूसत्य वृत्त):- भविष्यात विद्यार्थी व समाज हा मानसिक, शारीरिक तंदुरुस्ती व आनंदी कसा राहील याकरिता प्रताप क्रीडा मंडळ कार्यरत राहणार आहे.मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून यातून अनेकांचे भवितव्य  घडले असल्याचे मंडळाचे अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सांगितले. कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉल येथे प्रताप क्रीडा मंडळाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे स्पर्धा नियोजन प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते.
     यावेळी कु. स्वरूपारांणी मोहिते पाटील बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सन २०१७ पासून  मागील आठ वर्षात मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मकतेतून मंडळात नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  सध्या राष्ट्रीय पातळीवरील होणार्या घडामोडींचे परिणाम समाजावर होऊ लागले आहेत. सध्याचे युद्ध हे बौद्धिक गुणवत्तेच्या जोरावर होत आहे. समाजात शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक गोष्टीवर काम करणे गरजेचे आहे. जात, धर्म, प्रांत यामध्ये न अडकता खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. शिक्षित असण्याबरोबरच सुशिक्षित होणेही महत्त्वाचे आहे.  पुढील वर्षी राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       सयाजीराजे मोहिते पाटील यांनीही मंडळाच्या विविध उपक्रमांना शुभेच्छा दिल्या तर सचिव बिभीषण जाधव यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे प्रताप क्रीडा मंडळ हे राज्यात अग्रेसर असल्याचे सांगितले.
 सभेपुढील सहा विषयाचे वाचन सचिव  बिभीषण जाधव व सदस्यांनी केले. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यावेळी मंडळाचे सदस्य प्रताप पाटील, वसंत जाधव, यशवंत माने देशमुख, डॉ .विश्वनाथ आवड, बाळासाहेब सावंत, रामचंद्र मिसाळ, राहुल गायकवाड, भीमाशंकर पाटील, विशाल लिके, संजय झंजे, नंदकुमार गायकवाड, सुहास थोरात, फिरोज तांबोळी यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages