Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्नछत्र मंडळास सी.एस.आर. निधीतून एल.ई.डी. स्क्रीन भेट

 अन्नछत्र मंडळास सी.एस.आर. निधीतून एल.ई.डी. स्क्रीन भेट




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षामध्ये धार्मिकते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात देखील मोलाचे योगदान न्यास हे देत आहे अशा कार्याची दखल घेत सर्व सामान्यांना आर्थिक बळ देणारी, जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून ओळखणारी बँक ऑफ इंडिया, शाखा अक्कलकोट यांच्या वतीने अन्नछत्र मंडळास सी.एस.आर. निधीतून १५x१२ या आकाराची एल.ई.डी. स्क्रीन देण्यात आले आहे.

दरम्यान सदरचे एल.ई.डी. स्क्रीन हे अन्नछत्र मंडळाच्या परिसरातील दर्शनी भागात लावण्यात आलेले असून, याचे उदघाटन गुरुवारी गुरुपुष्यामृत दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. सदरचे उदघाटन बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक एफ.जी.एम.ओ. प्रमोद दिव्वेदी, पुणे, आंचलिक प्रबंधक चंद्रशेखर मंत्री सोलापूर झोन, अग्रणी जिल्हा प्रबंधक राम वाखर्डे, वरिष्ठ प्रबंधक शरणप्पा पुजारी, आर्थिक समायोजन प्रबंधक चेतना जरग सोलापूर, अक्कलकोट शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक महेश घुटे, वरिष्ठ प्रबंधक जेऊर शाखा पी. व्यंकटरमण्णा, नागणसूर शाखा प्रबंधक संतोष हत्तरकी, शिरवळ शाखा प्रबंधक लिंबाजी लाखे, प्रशासकीय प्रबंधक अविनाश माने अक्कलकोट शाखा, अक्कलकोट शाखेचे बँक अधिकारी आशिष बेरळीकर, ऋण अधिकारी संपतराव मगर, बँक कर्मचारी अंबादास जाधव, विजय कवंची, वैभव स्वामी, इंद्रजित बोरगावकर, आनंद जाजू, कांतीकुमार गायकवाड, महेश कनाला हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, न्यासाचे सनदी लेखापाल ओंकारेश्वर उटगे, प्रा. शरणप्पा अचलेर, अतिश पवार, विशाल कलबुर्गी,  प्रवीण घाटगे, गोटू माने, निखील पाटील, मुन्ना कोल्हे, शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस के स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments