Hot Posts

6/recent/ticker-posts

अण्णाराव कुंभार जिल्हा मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

 अण्णाराव कुंभार जिल्हा मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांना जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोहोळ येथील गायकवाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिक्षक आ.जयंत आसगावकर, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते अण्णाराव कुंभार व  ललीता कुंभार यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पाच हजार रुपयांचे धनादेश, शाल ,श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.  अण्णाराव कुंभार यांनी १९७४ ते २००४ पर्यंत मुख्याध्यापक संघाचे कार्य केले. तीस वर्षांच्या काळात मुख्याध्यापक संघाचे सदस्य, सहसचिव, सचिव, उपाध्यक्ष, अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक सचिवपदी कार्य करताना शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय दिल्याबद्दल मुख्याध्यापक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष तानाजी माने यांनी सांगितले. यावेळी माजी आ.दत्तात्रय सावंत, आ.जयंत आसगावकर ,सुभाष माने आदीनी कुंभार याच्या कार्याचे गौरव केले.यावेळी अण्णाराव कुंभार म्हणाले,  जिल्हा मुख्याध्यापक संघात तीस वर्षे कार्य करताना शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले.राज्यात  सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आदर्श बनविण्यासाठी तसेच मुख्याध्यापक भवन बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. यावेळी संस्था हितचिंतक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे आजी व माजी  शिक्षक वृंद यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments