ग्रंथपालन परीक्षेत कविता माने केंद्रात प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

ग्रंथपालन परीक्षेत कविता माने केंद्रात प्रथम

 ग्रंथपालन परीक्षेत कविता माने केंद्रात प्रथम

 



 



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा - 2025 परीक्षेत 700 पैकी 439 गुण मिळवून कविता नागेश कविता नागेश माने प्रथम, 411 गुण मिळवून मुश्रीफ शेख द्वितीय,  410 गुण मिळवून प्रतिभा हरिश्चंद्र पिंगळे तृतीय आल्या. महाराष्ट्र राज्यातून 1464 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 845 विद्यार्थी पास होऊन  58% निकाल लागला.         सोलापूर केंद्रातून 79 विद्यार्थ्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 52% निकाल लागला. जानेवारी 2025 ते जून 2025 या सहा महिन्याच्या कालावधीत राज्यात 24 जिल्ह्यात हा वर्ग चालविला होता. जून 2025 अखेरीस परीक्षा झाल्या होत्या. कविता माने, मुश्रीफ शेख यांचा सत्कार गुणपत्रक, ग्रंथभेट आणि बुके देऊन वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, लिपिक सारिका  माडीकर, सेवक गीतांजली गंभीरे, देगाव सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल राजश्री माशाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्गाचे मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे,  वर्गशिक्षक गणेश फंड, दत्ता मोरे, विनोद गायकवाड वृषाली हजारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages