लक्ष्मी आनंद विद्यामंदिरमध्ये 'हिंदी दिवस' व 'अधिकारी आपल्या भेटीला' उपक्रम संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व जुनि. कॉलेज टेंभुर्णी, येथे राष्ट्रीय हिंदी दिवस व अधिकारी आपल्या भेटीला हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रशालेतील हिंदी विभागाच्या वतीने राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी अतिथी स्वागतगीत गायले. फैज जहागिरदार याने गीतगायन केले. तसेच ५वी मधील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. अडाणे मॅडम यांनी हिंदी दिवसाचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले.
तसेच अधिकारी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सुषमा रामभाऊ पाटील(पीएसआय, बुलढाणा) व प्रतिभा रामभाऊ पाटील(BDO धाराशिव) या भगिनींचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी?कोणकोणती पुस्तके हाताळावीत? अभ्यासाची नियोजित वेळ? मोबाईलचा अतिवापर कसा टाळावा? अशा इत्यादी घटकांवरती प्रकाश टाकला. तसेच प्रश्नोत्तर स्वरुपात हे मार्गदर्शन संपन्न झाले.
संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा सुरज बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नितीन शिंदे सर, प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, समन्वयक लांडगे मॅडम, हिंदी विभाग प्रमुख अडाणे मॅडम तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments