Hot Posts

6/recent/ticker-posts

मगबुल मोहळकर व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; काँग्रेसला मोठा फटका

 मगबुल मोहळकर व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; काँग्रेसला मोठा फटका




मुंबई (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विकासात्मक दृष्टीकोन आणि एकात्मतेवर आधारित राष्ट्रवादीची वाटचलीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते हाजी मकबूल मोहळकर माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलिम पामा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे मगबुल मोहळकर यांचे चिरंजीव ॲड. ताजुदीन मोहळकर याच्यासह अनेक मान्यवरांनी आज मुंबई येथील महाराष्ट्र महीला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे साहेब याच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आमदार शिवाजीराव गर्जे आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी  जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा  यांची उपस्थितीत होत.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांचे पक्षात मनपूर्वक स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या माझे सहकारी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या सोबत आपण पक्षकार्य करीत अजितदादाचे हात बळकट करीत कराल तसेच  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याकरीता आपले योगदान महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव शहर मध्य अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे अल्ताफ बागवान मुशिर आळंदकर सिद्दिकी मुजावर सलीम शेख गौस नदाफ रफिक मुल्ला महबूब शेख वसीम सय्यद अबूबकर सय्यद मुज्जू नदाफ सोहेल सेख गौस मालकु अरबाज शेख रब्बानी शेख सोहेल शेख दुर्वेश  ऍड इस्माईल नालवार  विनोद जाधव नाना गोवर्धन सुरज कांबळे नितीन ढवण आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होत. 

Reactions

Post a Comment

0 Comments