फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला सडेतोड निवेदन
दरवर्षी पावसाळा जवळ आला की सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला वेध लागतात ते नालेसफाईचे शहरात सात ते आठ मुख्य नाले असून त्यांना जोडणारे सब नाले देखील आहेत, नाले साफसफाई च्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जाते , प्रत्यक्षात नाले साफसफाई म्हणावी तशी होत नाही मोठा पाऊस झाला की नाले तुंबतात आणि नागरिकांच्या घराघरात पाणी शिरतं परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते विशेष म्हणजे मुख्य नाल्यांना पावसाळ्यात पूरच येतो यापूर्वी नाल्यात वाहून जाऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहे यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव.नाल्यांमध्ये मोठमोठे झाडीझुडपी झालेली आहे ती तात्काळ काढण्यात यावी, पाऊसाचे पाणी घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी सर्व वस्तूंचे नासधूस झालेली आहे , कपडे अन्न धान्य वाहून गेलेले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत पुनर्वसन विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचा अहवाल महत्त्वाचा असतो.त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात पाहणी करून सर्व नुकसान झालेल्या नागरिकांचे पंचनामे करत आहेत प्रत्यक्षात अनेक पंचनामे राहिलेले आहेत ते लवकरात लवकर करून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी. पावसाच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे नागरिकांचे धोका निर्माण झालेला आहे तरी शहरात कचरा, ड्रेनेज, नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर आहे, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा शहरांच्या मुख्य नाल्यांमध्ये झाडी झुडपे मोठी झाल्याने नाल्यातील कचरा तुडुंब भरून वाहत आहे .सर्व झाडे झुडपांची तोडणी करून नाल्याची साफसफाई करून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments