सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात करार झाला. दरम्यान, या करारमुळे खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा व व्यावसायिक मार्गदर्शन मिळणार आहे.
शहरासाठीही हे मैदान महत्त्वाचे ठरेल, ज्यामुळे भविष्यात येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने आयोजित करता येतील. या ऐतिहासिक निर्णयामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळेल.
विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, संयुक्त सचिव खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालक व प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि सहसचिव चंद्रकांत रेम्बरसू यांच्या स्वाक्षर्या झाल्या.
0 Comments