"छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कष्टकरी, कामगार आणि वंचितांची व्यथा मांडली. त्यांच्या दर्जेदार साहित्यास अनेक पुरस्कार मिळाले. अनेक नाटक गीत आजही स्फुरण देतात. साहित्याचा बादशहा शासन दरबारात मात्र उपेक्षित राहिला ही खंत आज वाटत अस मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी महापौर अरिफ शेख, राम गायकवाड , ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे , माजी नगरसेवक हारुण शेख, युवराज पवार, ॲड शैलेश पोटफोडे, इरफान बागवान, हारिस शेख, रियाज पैलवान, रिझवान शेख, शोएब चौधरी, हुजेर बागवान, फुरखान बागवान, ईलियास शेख आदी उपस्थित होते.
0 Comments