Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदे सेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हेंसह 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

 शिंदे सेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हेंसह 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा जणांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह असंबंधित पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि वाढता हस्तक्षेप यामुळे पक्षाची वाताहत होत असल्याचा आरोप दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.
        या पत्रकार परिषदेत दिलीप कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक पद मला देण्यात आले. मात्र समन्वयक या नात्याने पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून कोणतीही विचारणा झाली नाही. वरिष्ठांनी बैठक घेतली पाहिजे तसे झाले नाही. शहर समन्वयक असतानाही परस्पर बाहेरील काही पदाधिकारी इतर पदे नेमतात. असंबंधित लोकांचा वाढता हस्तक्षेप आणि मनपाणीपणामुळे पक्षाची वाताहत होत आहे. या सदर्भात
 मुंबईत वरिष्ठांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. संबंध नसतानाही बाहेरील लोक थेट पक्षाची पदे नेमणे योग्य नाही. वरिष्ठांच्या सूचनांची पायमल्ली होत आहे. महापालिका निवडणुकांच्या संदर्भात आवश्यक ती संघटनात्मक बांधणी आणि इतर नियोजन गरजेचे आहे. त्या संदर्भात चर्चा नाही. पक्षाच्या वरिष्ठांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप दिलीप कोल्हे यांनी केला आहे.
     पक्षातील असंबंधित हस्तक्षेप आणि बाहेरील लोकांचा  मनमानीपणा यामुळे माझ्यासह अकरा जणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत. पक्षात एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत. येत्या चार दिवसात बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असेही दिलीप कोल्हे यांनी स्पष्ट केले.
      या पत्रकार परिषदेस राजीनामा दिलेले संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

 या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

शिवसेना शिंदे गटाचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख आशिष परदेशी, सोशल मीडिया शहर प्रमुख सागर शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख जवाहर जाजू , युवासेना उपशहर प्रमुख मयूर झांबरे, शिवसैनिक नवनाथ भजनावळे, राहुल काटे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, असे दिलीप कोल्हे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments