Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी औजारे व साहित्याची लॉटरी सोडत संपन्न

 कृषी औजारे व साहित्याची लॉटरी सोडत संपन्न




पात्र लाभार्थ्यांनी वेळेत औजारे खरेदी करणेची दक्षता घेण्याचे आवाहन

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत सन 2025-26 जिल्हा परिषद सेस योजने अंतर्गत जिल्हयातील शेतक-यांकरीता शेतीपुरक औजारे व साहित्य वाटपाकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अध्यक्षतेखाली लॉटरी सोडत संपन्न झाली. यावेळी त्यांनी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत औजारे खरेदी करण्याचे आवाहन केले.
    यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे उपस्थितीमध्ये लक्षांकानुसार लॉटरी (सोडत) जि. प. प्राथमिक शाळा नेहरूनगर, उत्तर सोलापूर या शाळेतील शाळकरी मुलांकडून लाभाथ्यांची लॉटरी (सोडत) काढण्यात आली.
  सोडतीत  निवड झालेल्या लाभार्थी यांना या आर्थिक वर्षामध्ये विहित खरेदी प्रक्रिया पूर्ण केले नंतरच सदर योजनेचा लाभ थेट पद्धतीने देय राहणार आहे.  सर्व सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी पंचायत समिती स्तरावर क्षेत्रीय यंत्रणेशी समन्वय साधुन वेळेत औजारे खरेदी करणेची दक्षता घेण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी केले आहे.
  यावेळी कृषि विभागाचे  हरिदास हावळे,  कृषी विकास अधिकारी राजाराम भोंग, गट विकास अधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर, सागर बारवकर, जिल्हा कृषी अधिकारी भारत कदम, जिल्हा कृषी अधिकारी  अजय वगरे, मोहिम अधिकारी  महेश पाटील,  सहाय्यक गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर, महा. प्रशासन अधिकारी सुर्यकांत मोहिते, राजश्री कांगरे, लता बनसोडे व जिल्हयातील शेतकरी लाभार्थी, तालुक्यातील कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषि यांचे उपस्थिती होती.
  औजारासाठी तालुकानिहाय एकुण उदिष्ट 2459 असुन त्याकरीता 21441 इतके अर्ज प्राप्त झाले होते.  मुख्य कार्यकारी अधिकारी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उपस्थीतीमध्ये सुरवातीला उत्तर पंचायत समिती कडील लाभार्थ्यांची सोडत शाळकरी मुलांकडुन काढणेत आली.
  प्राप्त अर्जाची छाननी तालुका पातळीवर करणेत येऊन पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा परिषदेकडे सादर करणेत आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पिकसंरक्षण औजारे/उपकरणे (श्रो पिस्टनस्प्रे पंप, पॉवर स्प्रेपंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सेंक्ट ट्रॅप), ट्रॅक्टर चलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर/विडर, पेरणी यंत्र), कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने पुरविणे. ( 5 एच पी सबमर्सिबल विदयुत पंपसंच, डिझेल इंजिन) कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने पुरविणे (कडबाकुटटी, ताडपत्री, मधुमक्षीका पेटी (25%), स्लरी फिल्टर) सेंद्रीय शेती 50% मर्यादित अनुदानावर DBT तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करणेत आली. तसेच प्रतिक्षा यादी देखील तयार करणेत आली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments