सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम मील रोलर पूजन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 8, 2025

सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम मील रोलर पूजन संपन्न

 सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम मील रोलर पूजन संपन्न


अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम 2025-2026 करीता मील रोलरचे पूजन सोमवार दि.07/07/2025 रोजी सकाळी 10:40 वाजता कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते संपन्न  झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री,विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम 2025-2026 चालू करण्याचे दृष्टीने कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर असून, शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतूकीचे वाहन करार सुरू असून ते अंतीम टप्प्यात आले असलेची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी दिली.
कारखान्याने गळीत हंगाम 2025-2026 मध्ये 9 लाख मे.टन. ऊस गाळप करणेचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या संचालिका स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. 
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख तसेच संचालक-लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे,  महादेव क्षिरसागर, भिमराव काळे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, धनंजय सावंत, नामदेव चव्हाण, धनंजय दुपडे, श्रीकांत बोडके व सौ.हर्षाली निंबाळकर तसेच सर्व खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages