लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर संधी मार्गदर्शनपर व्याख्यान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन हे लाभले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विनायक बाबर हे लाभले होते. प्रारंभी मा. विनायक बाबर यांचा सत्कार प्राचार्य सागर महाजन यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. त्यानंतर विनायक बाबर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पदवीनंतर बँकिंग क्षेत्रातील विविध करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्याना बँकिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा, त्यासाठी तयारी कशी करावी, करिअर म्हणून बँकिंग क्षेत्रातील विविध आव्हाने यासोबतच त्यासाठी लागणारी संवाद कौशल्य, लेखन, टायपिंग, अद्यावत तंत्रज्ञान, भाषा प्रभुत्व आदिंविषयी माहिती दिली. यासोबतच त्यांनी कृषि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील बियाणे व खते कंपन्या, संशोधन क्षेत्र, कृषी विभागातील विविध करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नक्षत्रा कांबळे यांनी व आभार प्रियंका वळसे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. अंकिता पवार, प्रा. निशा काटे तसेच लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सर्व विदयार्थी उपस्थित होते.
0 Comments