Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीकांत मोरे हे अर्थ आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- प्रशांत जोशी

 श्रीकांत मोरे हे अर्थ आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व- प्रशांत जोशी

 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा परिवाराच्या माध्यमातून विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे. श्रीकांत मोरे हे आर्थिक व साहित्यिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. मनोरमा बँकेचा एनपीए सलग सात वर्षे शून्य टक्के आहे, याचे हे उत्तम उदा. आहे, असे प्रतिपादन दै. संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीनिमित्त पाऊले चालती पंढरी वाट आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 कार्यक्रम आयोजिला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. यामध्ये विठ्ठलावरील आधारित कवितांचा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता मनोरमा सांस्कृतिक भवन, बेन्नूरनगर येथे पार पडला. अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे (ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष मसाप पुणे शाखा पश्चिम सोलापूर) होते. 
व्यासपीठावर  सौ. शोभा मोरे (अध्यक्षा, मनोरमा सखी मंच, सोलापूर),  सौ. अस्मिता गायकवाड, (कार्याध्यक्ष, मसाप पुणे शाखा प. सोलापूर), संतोष सुरवसे, (कार्यवाह), मनीष केत (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना), पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डॉ. मिताली मोरे,  शिल्पा कुलकर्णी (कोषाध्यक्ष / सचिव) उपस्थित होते.  
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी तीन वर्षाच्या बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांची उपस्थिती होती. यावेळी तीन वर्षाचा अन्वय बेडगे याने संत नामदेवांची गोष्ट सांगितली. तर प्रा. अनिल लोंढे यांनी विठ्ठलाची अनेक सुश्राव्य गीते गायिली. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे, मारुती कटकधोंड, बदिउज्जमा बिराजदार, प्रा. माऊली जाधव, प्रा. श्रुती वडकबाळकर, कालिदास चवडेकर, डॉ. शिवाजी शिंदे, गोविंद काळे सांगोल्याचे शिवाजी बंडगर, संध्या हेब्बाळकर यांनी कविता सादर केली. नान्नज येथील शुभम जांभळे गुरुजी आणि वडापूर येथील अरुण पाटील आणि कलाकारांनी विठ्ठलाचे भजन सादर केले. 
यावेळी सर्व मान्यवर आणि कलाकारांचा विठ्ठलाची सुबक प्रतिमा, शाल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माधवराव गव्हाणे, डॉ. प्रसन्न गव्हाणे, विलास मोरे, विजयराज शाबादे, अतुल बेले, झी चोवीस तासचे पत्रकार, मसापचे पुणे विभागीय प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, सोलापूर, सांगोला येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक, कर्मचारी, अधिकारी आदी उपस्थित होते. विद्या भगरे भोसले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल लोंढे यांनी गायिलेल्या विठ्ठल भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments