संभाजी ब्रिगेडच्या वतीने हद्दवाढ भागात दिंडीचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हद्दवाढ भागातील स्वागत नगर येथे संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागातील परिसरामध्ये देवशाहीनी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीमध्ये आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य महिला भक्तिभावाने विठूरामाच्या गजर करत सामील झाले होते देहू ते पंढरपूर वारी सुरू करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे योगदान होते त्यांनी दिंडीला संरक्षणाबरोबर आर्थिक मदत ही केली होती त्यामुळे या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी बरोबर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती चा समावेश करण्यात आला होता.
या दिंडी सोहळ्या संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनलताई दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे जिल्हा सचिव सिद्धाराम स्वळे जिल्हा सचिव बबन डिंगणे रवीकिरण दास राज स्वामी
शितल सलबत्ते प्रियंका राऊत राधा घुले संजीवनी सलबत्ते विजया काशीकर ताराबाई कोकाटे मैनाबाई साळुंखे माधुरी राऊत नीलम पाटील सुनिता कारंडे शकुंतला पवार शोभा देसाई राजश्री गद्रे ज्योती मोरे प्रज्ञा कोळी सविता तेल्लूर सुनिता साळुंखे गीता कलागते ज्योती घुलेद आधी सह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या
0 Comments