विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करा- सचिन कल्याणशेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करा- सचिन कल्याणशेट्टी

 विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करा- सचिन कल्याणशेट्टी  



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आपल्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलांची व मुलींची शाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १ लीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नवीन विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. अभ्यासाची गोडी त्यांच्यामध्ये वाढीस लागते. यासोबतच, ज्ञानार्जनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याचे आवाहन शिक्षकवर्गाला केले.
या वेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, मुख्याध्यापक शिवचलप्पा हडलगी, विलास गव्हाणे, तुकप्पा नागुर, सुरेश नागूर, अनिल पाटील, दयानंद बमनळी, संजय मोरे, सिद्धाराम जकापुरे, लक्ष्मीपुत्र निंबाळ, अयुब लुकडे, बसवराज बणेसुर, रुडप्पा येळसंगी, सिद्धाराम जंगी, तिप्पण्णा नागणसुर, चांद लुकडे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages