पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त होटगीत नारीं शक्तीचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त होटगीत नारीं शक्तीचा सन्मान

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त होटगीत नारीं शक्तीचा सन्मान



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी गावातील धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त होटगी गावांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांची सेवा करणाऱ्या 30 महिलांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती अशी माहिती सचिन लांडगे यांनी दिली.
 कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड तर प्रमुख अतिथी पदी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवडशेट्टी, युवा नेते विनोद पाटील, तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल लांडगे ग्रामपंचायत सदस्य असीम शेख,काशिनाथ गंगदे,शिवराज पाटील,निंबाळे, गिरगावकर,पोलीस पाटील, रेणुका इंगळे,अंबिका पाटील तंटामुक्त अध्यक्ष मंगेश सोनकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून सचिन लांडगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सांगून त्यांचा विचाराचा वारसा घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे व धनगर समाज बांधवांनी करीत असलेले चांगल्या उपक्रमाची माहिती सांगून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या होटगी गावातील वेगवेगळ्या विभागात प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा  फेटा बांधून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कल्याणी कोकरे, आसिम शेख यांनी आपल्या मनोगत आतून अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती सांगून चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रेवणसिद्ध लांडगे, उपाध्यक्ष बिरप्पा घोडके, भीमाशंकर बनसोडे, श्रीकांत सोनकडे, इंद्रजीत लांडगे, शैलेश सोनकडे, अप्पू घोडके, बाबुशा लांडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लांडगे यांनी केले तर आभार विजयकुमार लांडगे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages