भारतीय जैन संघटने तर्फे ग्रामसेवकांसाठी कार्यशाळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

भारतीय जैन संघटने तर्फे ग्रामसेवकांसाठी कार्यशाळा संपन्न

 भारतीय जैन संघटने तर्फे ग्रामसेवकांसाठी कार्यशाळा संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने  “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) स्वीकारले आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी आणि जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग घ्यावा यासाठी बीजेएस प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने बीजेएसच्या सहाय्याने योजनेचा प्रचार करण्यासाठी योजनेची माहिती देण्यासाठी आज दिनांक 02/05/2025 रोजी दुपारी  3 वाजता अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण पर आयोजित कार्यशाळा संपन्न झाली.
  सदर प्रशिक्षणाची सुरुवात सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम. भारतीय जैन संघटना राज्याध्यक्ष केतन शहा, जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल. पा ) जिल्हा परिषद, सोलापूर  संजय पारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला.
      गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार त्याचबरोबर अनेक उपक्रम अंतर्गत भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे. शिवाय जनजागृती च्या कार्यामध्ये भारतीय जैन संघटनेकडे विशेष प्राविण्यता आहे. व त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेले भारतीय जैन संघटनेचे कार्य मी स्वतः अनुभवले आहे. असे सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब सांगत होते. त्याचबरोबर सदर प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असून त्याबाबत आवश्यक ती उचित कार्यवाही आपण सर्व ग्रामसेवकांनी करून घ्यावी व आपला सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे ही आव्हान त्यावेळी कुलदीप जंगम यांनी केले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जैन संघटना राज्याध्यक्ष केतन शहा यांनी मांडले. प्रास्ताविक अंतर्गत त्यांनी सद्यपरिस्थितीला भारतीय जैन संघटनेचा राज्यरुपी कार्य अहवाल सादर केला. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सदर योजनेबाबतची तत्कालीन परिस्थिती समजावून सांगितली.
   सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून भारतीय जैन संघटना मुख्य कार्यालय नियुक्त जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे व विकास शेळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रशिक्षणासाठी अक्कलकोट,उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातून एकूण 130 ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर संबंधित तालुक्यातील विस्तार अधिकारी देखील उपस्थित होते. भारतीय जैन संघटना पदाधिकारी मधून राज्य सचिवा-संतोष भाभी बंब,राज्य कार्यकारिणी सदस्य शाम पाटील,
जिल्हा वाटर की पर्सन- विशाल मेहता,विभागीय उपाध्यक्ष- अभिनंदन विभुते, दक्षिण सोलापूर प्रतिनिधी - अशोक भालेराव, उत्तर सोलापूर प्रतिनिधी - विक्रांत बसेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कार्यकारणी सदस्य शाम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा वॉटर की पर्सन विशाल मेहता यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages